पुणे – मुळा- मुठा नदीकाठ सुधार प्रकल्पाकरीता पर्यावरण परवानगी मिळविण्यासाठी महापालिकेला पुरस्थितीसंदर्भातील तांत्रिक माहीतीसह स्टेट एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट अॅसेसमेंट अॅथाेरीटीकडे (सिया ) अहवाल सादर करावा लागणार आहे. याबाबत सियाच्या बैठकीच्या वृत्तांताचा अाधार घेत पर्यावरण प्रेमींनी सदर प्रकल्पा अद्याप पर्यावरणीय परवानगी मिळाली नसल्याचा दावा केला आहे. याविषयी पर्यावरण प्रेमी सारंग यादवाडकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
महापालिकेने मुळा – मुठा नदीकाठ सुधार प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. या प्रकल्पाचे अकरा टप्प्यात काम केले जाणार आहे. पहिल्या तीन टप्प्याचे काम सुरु झाल्यानंतर पर्यावरण प्रेमींनी या कामावर आक्षेप नाेंदवले हाेते. यामध्ये पर्यावरणीय परीणामांचा अहवाल केला असला तरी यात अनेक त्रुटी असल्याचा त्यांचा दावा होता. +तसेच त्यांनी राष्ट्रीय हरीत न्यायाधिकरणाकडे ( एनजीटी ) दाद मागितली हाेती. एनजीटीने काम सुरु असलेल्या तीन टप्प्यातील कामांना स्थगिती दिली नाही, मात्र उर्वरीत टप्प्यातील कामांच्या आठ निविदा काढू नये असे आदेश दिले हाेते. त्याचवेळी पर्यावरणीय परीणामांचा अहवाल पुन्हा करून घेण्याचे आदेशही दिले होते.
यानुसार अहवाल तयार करण्याचे काम हे स्टेट एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट अॅसेसमेंट अॅथाेरीटी (सिया ) ही संस्था काम करत आहे. पर्यावरण प्रेमींनी नाेंदविलेल्या आक्षेपानुसार सियाने महापालिकेला काही बाबींची पूर्तता करण्यास सांगितले आहे. यामुळे सदर प्रकल्पाला पर्यावरण परवानगी मिळालेली नाही असे स्पष्ट हाेत असल्याचा दावा यादवाडकर यांनी केला.
सीडब्ल्युपीआरएस या संस्थेकडून या प्रकल्पाचा हायड्राेलिक आणि हायड्राेलाॅजी अभ्यास अहवाल तयार करून घ्यावा, नदीकाठावर चॅनेलायजिंग केल्यामुळे नदीच्या पुर पातळीत किती वाढ हाेईल, तसेच नदीकाठाच्या भागात किती ठिकाणी पुराचे पाणी साठून राहू शकते याची माहिती मागवली आहे.
तसेच गेल्या शंभर वर्षातील नदीच्या पुराच्या पाण्याच्या पातळीची आकडेवारी लक्षात घेत पूर पातळी निश्चित करावी, पुराचे पाणी नियंत्रित ठेवण्याचा उद्देश या प्रकल्पाचा असुन ताे अधिक स्पष्ट झाला पाहिजे, ‘तेरी’ या संस्थेच्या अहवालानुसार पुढील काळात ढगफुटी सारखे प्रमाण वाढणार आहे. याचाही विचार अहवालात करावा, या नदीकाठ सुधार प्रकल्पासाठी केले गेलेले बांधकाम आणि नदीपात्रालगत केलेल्या बांधकामांची माहीती द्यावी अशा मुद्दयावर महापािलकेला अहवाल सादर करावा लागणार आहे.