पुणे – हवामानातील बदलामुळे शहरासह जिल्ह्यातील किमान तापमानात एक ते दोन अंशाने वाढ झाली आहे. त्यामुळे १० अंशाच्या खाली गेलेले किमान तापमान ११ ते १२ अंशाच्या पुढे गेले आहे. दरम्यान, दि. ५ फेब्रुवारीनंतर उत्तरी वाऱ्यामुळे पुणे शहरासह राज्यातील काही भागातील किमान तापमानात चार अंशांनी घट होईल.
परिणामी थंडीचा कडाका पुन्हा वाढण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. शनिवारी (दि. ३) शहरातील किमान तापमान १२.६ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. मात्र, पुढील २४ तासानंतर किमान तापमानात घट होण्याच्या शक्यतेमुळे पुन्हा थंडीचा पारा घसरेल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.