पुणे – ‘एमएचटी-सीईटी’चे टेन्शन गुल!

ऑनलाइन परीक्षेची स्वस्तात तयारी : विद्यार्थ्यांना सरावासाठी होतोय उपयोग

– व्यंकटेश भोळा

पुणे – इंजिनिअरिंग, फार्मसी आणि ऍग्रिकल्चर अभ्यासक्रमाच्या पदवी प्रथम प्रवेशासाठी अनिवार्य असणारी “एमएचटी-सीईटी’ यंदा प्रथमच पुढील महिन्यात ऑनलाइनद्वारे पद्धतीने होत आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन सीईटीची भीती वाटू नये, त्यासाठी सीईटीसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना माफक शुल्कात सराव परीक्षेची संधी राज्य सीईटी सेलने उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन “एमएचटी-सीईटी’ची योग्य पद्धतीने सराव होण्याची चिन्हे आहेत.

बारावी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांकडून या सीईटीसाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्यासाठी 1 जानेवारी ते 31 मार्च अशी अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली होती. यंदा “एमएचटी-सीईटी’ 4 लाख 13 हजार 284 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. तसेच, या सीईटीसाठी 9 हजार 141 विद्यार्थ्यांचे अर्ज अपूर्ण राहिले आहेत. गतवर्षीचा विचार करता यंदा सुमारे 25 हजारांहून अधिक अर्ज कमी आल्याचे स्पष्ट होत आहे. यंदाची सीईटी 2 मे ते 13 मे या कालावधीत होणार आहे.

“एमएचटी-सीईटी’ ही दरवर्षी लेखी पद्धतीने घेतली जात होती. त्यात वस्तुनिष्ठ स्वरुपाचे प्रश्‍न विचारले जाते होते. त्यास चारपैकी एक उत्तराचा पर्याय विद्यार्थी निवडत असत. आता मात्र सीईटी पहिल्यादांच ऑनलाइनद्वारे होत आहे. ही त्यामुळे विद्यार्थ्यांना मनात पहिल्याच सीईटीविषयी थोडी चितेंचे वातावरण आहे. बहुतांश विद्यार्थी आता मोबाइल योग्य पद्धतीने हाताळत आहेत. त्यामुळे ऑनलाईन सीईटीचा फारसा अडचण येणार नसल्याचे राज्य सीईटीचे म्हणणे आहे. मात्र ऑनलाईन सीईटीचा अनुभव मिळावा, यासाठी राज्य सीईटी सेलने सराव परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. ते विद्यार्थ्यांना उपयुक्‍त ठरणार आहे. येत्या सीईटीच्या ऑनलाइन परीक्षेच्या धर्तीवरच ही सराव परीक्षा असेल. या परीक्षेचे पॅटर्न पद्धतही संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या सराव परीक्षेचे केंद्र निवडण्यासाठी विद्यार्थ्यांना 25 रुपये शुल्क निर्धारित करण्यात आले आहे.

सराव परीक्षेसाठी नोंदणी अनिवार्य
“एमएचटी-सीईटी’ सराव परीक्षेसाठी नोंदणी करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी बारावी परीक्षेचे हॉलतिकीट बंधनकारक आहे. नोंदणीसाठी राज्य सीईटीचे सेलचे संकेतस्थळ दि. 10 एप्रिलपासून खुली होणार आहे. दि. 12 ते 30 एप्रिल या दरम्यान ही सराव परीक्षा संबंधित केंद्रावर होईल. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेची वेळ ई-मेल अथवा एसएमएसद्वारे कळविले जाईल. विद्यार्थ्यांनी जवळचे परीक्षा केंद्र निवडावे, असे आवाहन राज्य सीईटीचे सेलचे आयुक्‍त आनंद रायते यांनी केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.