पुणे : मुळशी तालुक्यातील कोलाड पुणे महामार्गावर पिरंगुट घाटात तीव्र उतारावर एका मालवाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर या अपघातात टेम्पोने 6 वाहनांना धडक दिली आहे. या अपघातात सात जण जखमी झाले आहे. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे. या अपघातचे धडकी भरवणारे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.
टेम्पो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत टेम्पो चालक गोविंद भालचंद्र लाल याच्यावर पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
#पुणे : टेम्पो चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. अनेकांना चिरडलं, मुळशीतील अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद #pune #punenews #punecrime #CCTV pic.twitter.com/UnmD6xyyzW
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) November 21, 2023
पुणे कोलाड महामार्गावर पिरंगुट येथील घाट उतारावर बाजूला सिमेंटच्या विटा घेऊन जाणाऱ्या टेम्पोने पाच दुचाकी आणि एका चार चाकी वाहनांना धडक दिली.
या अपघातात सात जण जखमी झाले आहेत. जखमीमध्ये एका डॉक्टरचा समावेश असून गंभीर अवस्थेत त्यांना पुणे येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी पाठवले आहे. उर्वरित सहा जखमींना पिरंगुट तसेच लवळे फाटा येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.