सकल जैन संघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
पुणे – जैन दिगंबर मुनी आचार्य श्री 108 कामकुमारनंदजी महाराज यांच्यावरील अमानुष हल्ल्याच्या निषेधार्थ सकल जैन संघाच्या वतीने आज (दि. 20) साधु-संत सुरक्षा मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हल्लेखोरांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यांच्या वतीने उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी हे निवेदन स्वीकारले.
बेळगाव जिल्ह्यातील चिकोडीजवळील हिरेकोडी गावात जैन मुनी आचार्य श्री 108 कामकुमारनंदजी महाराज यांचे अपहरण करून त्यांची 5 जुलैला अमानुष हत्या करण्यात आली. या घटनेतील आरोपींना कडक शिक्षा व्हावी, तसेच जैन मुनींना सुरक्षा मिळणे आदी बाबींचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
ओसवाल बंधू समाज भवन येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात हजारो श्रावक-श्राविका सहभागी झाले होते. मोर्चातील सर्व सहभागींनी हत्येच्या निषेधार्थ काळ्या पट्ट्या बांधलेल्या होत्या. या मोर्चात महिलांचाही सहभाग लक्षणीय होता.
यावेळी मिलिंद फडे, अचल जैन, अभय छाजेड, ऍड. शीतल लोहाडे, प्रवीण चोरबेले, डॉ. कल्याण गंगवाल, सुरेंद्र गांधी, अनिल गेलडा, विलास राठोड, अण्णा पाटील, चंद्रकांत पाटील, अभय जैन, सुमित जैन, मनीष जैन, मनीष बडजाते, नेमीचंद ढोले, राजकुमार चौगुले, उदय लेंगडे, अशोक जैन, सुजाता शहा, वैजयंती शहा, प्रतिमा शहा, संगीता जैन, शैला भूस, पुष्पा पाटील, अशोक पगारिया, अजित पाटील, सुदीन खोत, निश्चल जोशी, शांतीकुमार शहा, सचिन कारंडे, उदय शहा, सुरेश शहा, रितेश जैन, वीरेंद्र शहा, महावीर शहा, सुकुमाल जैन यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.