पुणे – शहरात पुढील तीन दिवस थंडीचा जोर कमी-अधिक होईल. मात्र, नवीन वर्षात राज्यातील काही भागात पावसाच्या हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, बुधवारी (दि. 27) शहरातील किमान तापमान 13 अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली.
यंदा हवामानातील सततच्या बदलामुळे कधी पाऊस तर कधी थंडी आणि मध्ये उन्हाचा चटका असा अनुभव पुणेकर घेत आहे. हीच परिस्थिती संपूर्ण राज्यात आहे. मागील दहा दिवसांपासून थंडीचा जोर वाढत असताना अचानक उन्हाचा चटका आणि पहाटे धुके पडत आहे. तर आता ढगाळ वातावरणाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. नवीन वर्षाच्या सुरवातीला राज्यातील हवामाना बदल होवून किमान तापमानात वाढ होईल. त्यामुळे थंडी जोर कमी होईल. ढगाळ वातावरणामुळे काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
गेल्या 24 तासातील काही भागातील किमान तापमान
हवेली 11, पाषाण आणि एनडीए 12, शिवाजीनगर, तळेगाव 13, इंदापूर, पुरंदर 14, राजगुरूनगर, लवासा 15, कोरेगाव पार्क 17, मगरपट्टा 18.2, वडगावशेरी 19.