पुणे –करोना प्रतिबंधक लसींची मागणी कमी झाल्याने पुण्यातील “सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ने लसीचे उत्पादन जानेवारीमध्ये थांबवले होते. मात्र, आता 18 वर्षांपुढील नागरिकांना बुस्टर डोस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केल्याने या मोहिमेला आता “बुस्ट’ मिळण्याची शक्यता आहे.
कंपनीकडे सध्या 200 दशलक्ष इतका कोविशील्डचा साठा आहे. लाभार्थी पूर्णपणे कव्हर झाल्याने आता मागणीत घट झाली होती. त्यामुळे जानेवारीपासून त्याचे उत्पादन थांबवले होते. केंद्र सरकारने गेल्या रविवारपासून 18 वर्षांवरील सर्वांसाठी “बुस्टर’ डोस देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र, हा डोस सरकारी नव्हे खासगी लसीकरण केंद्रांवर स-शुल्क देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सरकारी सुविधांकडून दोन लसी मोफत मिळत असल्याने विशेषत: खासगी रुग्णालयांमध्ये लसींची गरज जवळजवळ कमी झाली आहे. घटत्या प्रकरणांमुळे आता तिसऱ्या डोसची गरज भासू लागली आहे. डॉ. एच. के. साळे, कार्यकारी संचालक,
नोबल हॉस्पिटल
सध्या पुणे शहरातील खासगी रुग्णालयांच्याकडे त्यांच्या स्टॉकमध्ये सुमारे 14 ते 15 लाख डोस उपलब्ध आहेत. या रुग्णालयांनी ते सरकारने 18 पेक्षा जास्त वयाच्या सर्वांसाठी बुस्टर डोस जाहीर करण्यापूर्वी खरेदी केले होते. पुणे शहरात सुमारे 36 खासगी लसीकरण केंद्रांकडे जुना स्टॉक आहे. ते हा बुस्टर डोस देण्याला सुरुवात करतील. सध्या एकूणच मागणी कमी असल्याने आणखी स्टॉक ठेवायचा की नाही याबाबत खासगी रुग्णालय साशंक आहेत.
डॉ. संजय पाटील, अध्यक्ष, हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया