पुणे – “श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’, “वंदे मातरम्’ संघटना आणि “युवा फिनिक्स सोसायटी’ यांच्या विद्यमाने अभिनव पुस्तक दहीहंडीचे आयोजन स. प. महाविद्यालयात करण्यात आले होते. पुस्तक दहीहंडीचे हे 19 वे वर्ष आहे. दरम्यान, “आपले घर’ संस्थेच्या विद्यार्थांनी ही दहीहंडी फोडली.
यावेळी “श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’चे विश्वस्त आणि उत्सवप्रमुख पुनीत बालन, स. प. महाविद्यालयाचे प्राचार्य सुनील गायकवाड, तुळशीबाग मंडळाचे नितीन पंडित आदी उपस्थित होते. “समाजसेवेतून देशसेवा करता येते. त्यामुळे पहिल्यांदा समाजाची सेवा करा, त्यातून देशसेवा आपोआपच घडेल,’ असे मत बालन यांनी यावेळी व्यक्त केले. दरम्यान, युवा उद्योजक पुनीत बालन यांच्यातर्फे आजपर्यंत या पुस्तक दहीहंडी उपक्रमाला अकरा हजार पुस्तकांची मदत करण्यात आली आहे.