पुणेकरांनो सावधान! कोरोना फोफावतोय…

पुणे, दि. 21 – शहरात आज नव्याने 443 करोना बाधित सापडले आहेत. सलग चौथ्या दिवशी ही बाधित संख्या वाढलेली असून, बाधितांची एकूण संख्या 1 लाख 66 हजार 652 वर पोहचली आहे. त्याचबरोबर गेल्या 24 तासात सक्रीय बाधितांच्या संख्येतही दोनशेने वाढ झाली आहे. या वाढत्या संख्येमुळे महापालिका आरोग्य विभागाकडून नमुने तपासणीच्या संख्येतही वाढ केली आहे.

शनिवारी (दि. 21) दिवसभरात 4 हजार 396 जणांची तपासणी करण्यात आली आहे. शुक्रवारी 4 हजार 200 जणांची तपासणी केली असून, त्यामध्ये जवळपास तीन हजार नमुने अहवालातून आजची बाधित संख्या समोर आली आहे. संशयित व्यक्तींची तात्काळ तपासणी करून उपचाराला सुरवात व्हावी यासाठी या चाचण्या वाढविण्यात आल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे लक्षणे दिसताच नागरिकांनी जवळच्या तपासणी केंद्रात कोवीड चाचणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

चार हजारापर्यंत खाली आलेली शहरातील सक्रीय बाधितांची संख्या आज 4 हजार 821 इतकी आहे. त्यातील 395 बाधितांची प्रकृती चिंताजनक असून, 247 बाधित व्हेंटीलेटर तर 148 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. दिवसभरात 246 बाधित करोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासात 4 जणांचा करोनामुळे मृत्यु झाला असून, मृत्युची एकूण संख्या 4 हजार 421 वर पोहचली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.