यंदाच्या गाजलेल्या पुस्तकांमध्ये 3 भारतीयांच्या पुस्तकांचा समावेश

न्यूयॉर्क – या वर्षी गाजलेल्या 100 पुस्तकांच्या यादीमध्ये तीन भारतीयांनी लिहीलेल्या आणि टीकाकारांनी गौरवलेल्या तीन पुस्तकांचाही समावेश आहे. “न्यूयॉर्क टाईम्स’ने ही यादी प्रसिद्ध केली आहे.

या यादीमध्ये अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘अ प्रॉमिस्ड लॅंड’ या आठवणींच्या संग्रहाचाही समावेश आहे. “न्यूयॉर्क टाईम्स’च्या संपादक मंडळाने काल्पनिक, कविता आणि वास्तव अशा श्रेणींमधील 100 पुस्तकांची निवड केली आहे.

या यादीमध्ये जन्माने भारतीय असलेल्या मेघा मजुमदार यांनी लिहिलेल्या ‘ए बर्निंग’ या काल्पनिक साहित्याचाही समावेश आहे. यामध्ये भारतातील महानगरांमधील दहशतवादी कृत्यांमुळे एखाद्या निरपराध व्यक्‍तीला भोगाव्या लागलेल्या तुरुंगवासाची कहाणी आहे.

केरळमध्ये वाढलेल्या दीपा अनप्पा यांनी लिहिलेल्या ‘दिजिन पेट्रोल ऑन पर्पल लाईन’ चाही यादीमध्ये समावेश आहे. या पुस्तकात आपल्या वर्गातील बेपत्ता झालेल्या मित्राचा शोध घेण्याचा 9 वर्षांच्या मुलाकडून झालेल्या प्रयत्नाची कथा आहे.

तर सामंत सुब्रमण्यम यांचे ‘अ डॉमिनंट कॅरॅक्‍टर : द रॅडिकल सायन्स ऍन्ड रेस्टलेस पॉलिटिक्‍स ऑफ जे.बी.एस. हल्डाने’ एक काल्पनिक कथाही या यादीमध्ये आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.