pune news : वनविभागाने धाड टाकून केलेल्या कारवाईत बिबट्या सदृश वन्य प्राण्याचे अवयव आढळून आल्या प्रकरणात विश्वजित जाधव याला अटकपूर्व जामीन मंजुर झाला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.एस. वाघमारे यांनी हा आदेश दिला आहे. त्याच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार वनविभागाने ही कारवाई केली होती.
या प्रकरणात जाधव याने ॅड. पुष्कर दुर्गे यांच्यामार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मांडवी खुर्द येथील ३०१ व ३०२ येथे शेट्टी फार्म हाऊस येथे ही कारवाई करण्यात आली होती. तेथे कपाटामध्ये बिबट्या सदृश वनप्राण्याचा पंजा आणि चार नख्खे आढळून आले होते. पती-पत्नी दोघेही पुण्यातील एका नामांकित हॉटेल संबंधी आहेत.
दोघात कौटुंबिक वाद सुरू आहेत. जूनपासून विश्वजित फाॅर्म हाऊसवर गेलेले नाहीत. ते अवयव स्वत: आरोपीकडून जप्त करण्यात आलेले नाही. ते कशाचे आहे, हे अद्याप कळले नाही.
पतीविरोधात केसे दाखल केल्यानंतर तिने याबाबत तक्रार दिली आहे. तेथे वनरक्षकाला ती स्वत: घेऊन गेली. तेथे अवयल असल्याचे तिला कसे माहिती होते, हे संशयास्पद आहे. त्या्मुळे त्याला जामीन देण्याची मागणी ॅड. पुष्कर दुर्गे यांनी केली.