Ketaki Mategaonkar : अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगावकर सध्या सोशल मीडियावर सक्रीय असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकदा तिला सोशल मीडियावर ट्रोल देखील केले जाते. मात्र ट्रोल करणाऱ्यांना ती सडेतोड उत्तर देखील देते. सध्या तिने शेअर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. यातून कलाकारांना एखाद्या कार्यक्रमादरम्यान करावी काटकसर, मेहनत याबाबत भाष्य केले आहे. नुकतेच तिने छत्रपती संभाजी नगरमध्ये एका शोदरम्यान हजेरी लावली होती.
त्याबाबत अभिनेत्री केतकी माटेगावकरने एक खास पोस्ट शेअर केली आहे. यात केतकीने लिहिले की, “सुप्रभात, सिल्लोड, छत्रपती संभाजी नगरमध्ये हृषीकेश रानडे व अली हुसैन यांच्याबरोबर पार पडलेल्या कार्यक्रमाचे काही फोटो शेअर करत आहे. यातील प्रत्येक क्षण मजेशीर होता. जरी कार्यक्रम उशिरा सुरु झाला असला तरी मज्जा आली. विमानाच्या वेळांमुळे सलग दोन रात्री झोपले नव्हते. एका गायकाचा किंवा गायिकेचा आवाज चोवीस तास त्यांच्याबरोबर असतो. त्यामुळे त्याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. पण कधी कधी सकाळी ४ वाजता एअरपोर्टवर डोसा खाणं, कार्यक्रमानंतर २.३० वाजता जेवण करणं. हे होत राहतं… ”
View this post on Instagram
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच केतकीने बॉडी शेमिंग करणाऱ्या आणि ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले होते. “शरीर आपल्याला देवाने दिलेली देणगी आहे. मी तुमच्या भाषेत, स्किनी, (हाडांचा सापळा) बारीक आहे. हो आहे आणि तरी सुद्धा मला त्याचा अभिमान आहे. माझे वडील, माझे आजोबा सगळे बारीक, तशी मी सुद्धा आहे बारीक. तरीही अजिबात न थकता 17-18 तास शूट करताना हेच माझं शरीर माझी उत्तम साथ देते,” असे तिने पोस्टमध्ये म्हंटले होते.
केतकीने ‘टाइमपास’ या चित्रपटात मुख्यभूमिकेत काम केलं होतं. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे अनेकांनी कौतुक केले होते. याशिवाय तिने काकस्पर्श, शाळा या चित्रपटांमध्ये देखील उत्तम काम केले आहे. याशिवाय केतकी उत्तम गायिका देखील आहे. अनेक ठिकाणी तिचे स्टेज शो होतात. तिथे प्रेक्षकांची देखील मोठी गर्दी पाहायला मिळते.