पुणे – पुणे- सोलापूर महामार्ग आणि नाशिक महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आता उपाययोजना हाती घेतल्या आहेत. या दोन्ही रस्त्यावरील ब्लॉक स्पॉट निश्चित करून तेथे विविध उपयोजना राबविण्यात येणार आहे.
मुंबई-बेंगळुरू रस्त्यावरील नवले पूल येथे वाढत्या अपघातांची संख्या लक्षात घेऊन त्या ठिकाणी वाहने न्यूट्रल केल्यास थेट गुन्हे दाखल करणे, पोलिस चौकी उभारणे, अतिरिक्त रम्बल स्ट्रीप्स बसविणे, जड वाहने आणि दुचाकी वाहनांना वेगळे करणे,
सेवा रस्त्यांवरील अतिक्रमणे काढणे, जड वाहने सेवा रस्त्यांवर न जाण्यासाठी अडथळे बसविणे, अशा विविध उपाययोजना जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आल्या.
त्याचा परिणाम काही प्रमाणात दिसू लागला आहे. त्याच धर्तीवर आता सोलापूर रस्ता आणि नाशिक रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून या दोन्ही रस्त्यावरील ब्लॉक स्पॉट केंद्रित करण्यात आले आहे.