पुणे – दहावी, बारावीच्या परीक्षा यंदा ऑफलाइन होणार आहेत. त्यामुळे मनपा शाळांतील इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क भरण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.
याबाबत समितीची अध्यक्ष हेमंत रासने म्हणाले, “महापालिकेच्या शिक्षण विभागातील 44 माध्यमिक शाळांमधून 4 हजार 392 विद्यार्थी यंदा दहावीच्या परीक्षेला बसणार आहेत. त्यांचे प्रति विद्यार्थी 415 रुपये आणि तंत्रशाळेतील 200 विद्यार्थ्यांचे प्रति 525 रुपये परीक्षा शुल्क भरले जाणार आहे. तर, पाच कनिष्ठ महाविद्यालयांतील 449 विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसतील. वाणिज्य-430 आणि विज्ञान शाखेसाठी प्रत्येकी 490 रुपये परीक्षा शुल्क भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. शिक्षण विभागाकडून याबाबतचा प्रस्ताव मंगळवारी स्थायी समितीत ठेवला होता. दरम्यान, मागील स्थायी समितीच्या बैठकीत महापालिका शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्यासाठी डीबीटीद्वारे शैक्षणिक साहित्याचा निधी मंजूर करण्यात आला आहे.