कात्रज – पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाकडून जिल्ह्यातील १५२ पात्र ठरलेल्या संस्थांना प्रतिलिटर एक रुपया भाववाढ देण्यात आली आहे, असे संघाचे चेअरमन भगवान ज्ञानोबा पासलकर यांनी सांगितले.
जिल्हा दूध उत्पादक संघ संचालक मंडळाने कात्रज पशुखाद्याच्या विक्रीमध्ये वाढ होण्यासाठी विविध प्राथमिक सहकारी दूध उत्पादक संस्थेने प्रतीदिन दूध संकलनाच्या प्रमाणात २५ टक्के कात्रज पशुखाद्य म्हणजे प्रती लिटरला खरेदी करणाऱ्या संस्थांना दूध दरामध्ये प्रति लिटर एक रुपया वाढीव दर देण्याचा निर्णय घेतला आहे.
संघातील संस्थांनी संघांमध्ये डिसेंबर २०२३ मध्ये घातलेले दूध व सदर संस्थांनी डिसेंबर २०२३ मध्ये खरेदी केलेले कात्रज पशुखाद्य याची आकडेवारी विचारात घेऊन दूध दरामध्ये प्रतीलिटर वाढीव एक रूपया देण्याकरिता १५२ संस्था पात्र ठरल्या आहेत. संघाचे चेअरमन भगवान पासलकर यांच्या हस्ते याबाबतचे धनादेश वाटप करण्यात येत आहे, असे व्यवस्थापकीय संचालक मनोज लिमये यांनी सांगितले.