बेल्हे, (वार्ताहर) – राज्य शासनाने दूध उत्पादक शेतकर्यांना पाच रुपये प्रतिलिटर अनुदान देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार प्राथमिक टप्यात राजुरी (ता. जुन्नर) येथील गणेश दूध संस्थाच्या 209 शेतकर्यांना 74 हजार 255 हजार लिटर दुधाला पाच रुपये प्रमाणे 3 लाख 71 हजार 275 रुपये अनुदानाची रक्कम शासनामार्फत थेट बळीराजाच्या खात्यावर जामा केले आहेत, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब हाडवळे व उपाध्यक्ष लक्ष्मण घंगाळे यांनी दिली.
दूध उत्पादकांना अनुदान मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, दुग्ध विभागाचे सचिव तुकाराम मुंडे, जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी सतीश डोइफोडे यांच्या विषेश प्रयत्नांतुन पशुसंवर्धन डॉ. श्रीधर बडे तसेच संस्थेचे सचिव निवृत्ती हाडवळे व संस्था कर्मचार्यांनी यासाठी मेहनत घेतली.
तसेच उर्वरित जास्तीत जास्त दूध उत्पादकांना पुढील दोन टप्यांमध्ये अनुदान योजनेचा लाभ मिळण्यासाठी शासनाच्या विहीत नमुन्यातील दुधाची माहीती अपलोड केलेली असल्याचे व लवकरच त्यांना देखील अनुदानाचा लाभ मिळणार असल्याचे संस्था सचिव यांनी सांगितले.