पुणे – अल्पसंख्याक योजनांच्या आढाव्यासाठी बैठक

पुणे – अल्पसंख्याक विभागाच्या योजनांचा आढावा घेण्यासाठी व पुढील वर्षांचे नियोजन करण्यासाठी अल्पसंख्याक व्यवस्थापनाच्या माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, संस्थांचे अध्यक्ष, सचिव यांची येत्या 4 मे रोजी बैठक घेण्यात येणार आहे. ही बैठक आझम कॅम्पस्‌ मधील अँग्लो उर्दू मुलांच्या शाळेत सकाळी 10.30 वाजता होणार आहे.

अल्पसंख्याक शाळांसाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात. या योजना शाळा व अल्पसंख्याक संस्थांपर्यंत पोहचाव्यात व शाळांनी त्याचा लाभ घ्यावा यासाठी शिक्षण विभागाकडून दरवर्षी जोरदार प्रयत्न करण्यात येतात. अधिकाधिक शाळा व संस्थांना योजनांचा लाभ व्हावा यासाठी बैठकीला उपस्थित राहवे, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ.गणपत मोरे, निरंतर शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी हरुन आतार यांनी पुणे जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या अल्पसंख्याक संस्थाच्या अध्यक्ष, सचिव व शाळांच्या मुख्याध्यापकांना दिल्या आहेत. अल्पसंख्यांक शाळा व संस्थांसाठी स्वतंत्र नियमावलीच लागू करण्यात आलेली असून त्याची अंमलबजावणी करणाऱ्यांनाच योजनांचा फायदा घेता येतो. या बैठकीत शाळा व संस्थांना आपल्या अडचणीही मांडता येणार असून विविध प्रकारच्या सूचनाही सादर करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेचे प्रशासकीय अधिकारी, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील संबंधित शाळा व संस्थांना बैठकीला वेळेत उपस्थित राहण्याच्या सूचना देण्याचे आदेशही बजाविण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.