पुणे – फळे, फुले आणि भाजीपाल्याच्या घाऊक व्यापाऱ्यानंतर आता किरकोळ व्यापारीही मराठा आरक्षणासाठी सरसावले आहेत. या पार्श्वभूमीवर बुधवारी महात्मा फुले मंडई बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती येथील शेतमाल व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कासुर्डे यांनी दिली.
शिवाय,मार्केट यार्डातील घाऊक बाजार बंद ठेऊन साखळी उपोषण करण्यात येणार असल्याचे व्यापारी संघटनांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. या आंदोलनाला कामगार युनियनही सहभागी होणार असल्याचे अध्यक्ष संतोष नांगरे यांनी सांगितले.