पुणे – बुधवारी (दि.26) प्रजासत्ताक दिन आहे. त्यामुळे मार्केट यार्डातील फळे-भाजीपाला, पान, केळी, गुरे, गुळ-भुसार, फुलांचा बाजार, भुईकाटा, पेट्रोलपंप, तसेच मोशी, उत्तमनगर, मांजरी आणि खडकी येथील उपबाजार बंद राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीस आणू नये. ग्राहकांनी खरेदीस येऊ नये, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेचे प्रशासक मधुकांत गरड यांनी केले आहे.