पुणे – महाराष्ट्र अॅकॅडमी ऑफ सायन्सतर्फे विश्वशांतीसाठी जीवन समर्पित करणारे डॉ. विश्वनाथ कराड यांना ऑनररी डिस्टींगविश फेलो हा सन्मान शास्त्रज्ञ डॉ. जी. डी. यादव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कोथरूड येथील एमआयटी डब्ल्यूपीयूच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात हा सन्मान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र अॅकॅडमी ऑफ सायन्स आणि एमआयटी हे दोघेही मिळून कार्य करणार आहेत. तसेच डॉ. विश्वनाथ कराड यांना महाराष्ट्र सायन्सेस काॅंग्रेसचे पॅटर्न म्हणून घोषित केले. यावेळी डॉ. राधाकृष्णन, प्र- कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, शास्त्रज्ञ डॉ. जयंत खंदारे, डॉ. भरत काळे उपस्थित होते.
डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, शिक्षण म्हणजे सुख, समाधान आणि शांतीचा मार्ग. हाच धागा पकडून विद्यार्थ्यांना मूल्याधिष्ठित शिक्षण येथे दिले जात आहे. संत ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराज यांच्या नावाने राजबाग येथे उभारण्यात आलेल्या डोममधून विश्वशांतीचे कार्य सुरू आहे. ज्ञान, भक्ती आणि कर्म हे सर्वात महत्त्वाचे आहे. डॉ.जी. डी. यादव म्हणाले, डॉ. विश्वनाथ कराड यांनी स्थापन केलेल्या माईर्स एमआयटीच्या माध्यमातून दिला जाणारा विश्वशांतीचा संदेश आजच्या काळात अत्यंत महत्त्वाचा आहे.