Pune : कात्रज उद्यानांमधील बिबट्या अनाथालयातून बाहेर पळाल्याची घटना काल सोमवारी उघडकीस आली. यानंतर उद्यान प्रशासनाकडून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नागरिकांसाठी बाग बंद करण्यात आली आहे. अद्यापही बिबट्या पकडला गेलेला नाही. काल पहाटे पिंजरामधून बिबट्या प्रसार झाल्याचे लक्षात आल्यापासून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पथके तैनात करण्यात आले असून, त्याला जेरबंद करण्यासाठी सर्वोत्परी प्रयत्न केले जात आहे.
सदर बिबट्याचे नाव सचिन असून तो 7.5 वर्षांचा आहे. त्याला जेरबंद करण्यासाठी उद्यान परिसरातील सर्व CCTV चेक केले जात असून तो झूमध्येच अधून-मधून दिसत आहे. नुकतेच सकाळी 6-7 वाजण्याच्या सुमारास झू किचनजवळ CCTV मध्ये दिसत आहे. हा बिबट्या जंगली नसल्याने तो बाहेर जाणार नसल्याचे सांगितले जात आहे. कात्रज उद्यानामध्ये भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये असते. बिबट्या पिंजऱ्यातून बाहेर पडला असल्याने पूर्ण झूला आतून आणि बाहेरून सील करण्यात आले आहे. दरम्यान, हा Captive animal असून झूमध्येच वाढलेला आहे. तसेच खाऊ घालणारी माणसे आणि डॉक्टर यांची त्याला रोजची सवय आहे.
याबाबत पुणे महानगरपालिकाने देखील नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच बिबटयाला पिंजऱ्यात पुन्हा बंद करण्यासाठी वन विभाग, पालिका, पोलीस, अग्निशमन विभाग तैनात करण्यात आले आहे. तसेच वन विभाग, पुणे महानगरपालिका अग्निशमन दल व पालिकेचे वरिष्ठ अधिकरी देखील घटनास्थळी उपस्थित आहेत.