पुणे,{प्रभात वृत्तसेवा} – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आघाडीला यश मिळावे. केंद्रात पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी, तर राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार स्थापन होवो, अशी पार्थना गणराया चरणी केल्याचे विधान परिषदेच्या उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वतीने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेश मंदिर येथे ६० किलो वजनाचा मोदक अर्पण करण्यात आला.
या वेळी डाॅ. गोऱ्हेंसह शिवसेना पुणे शहर आणि जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. या वेळी पुणे शहर प्रमुख प्रमोद भानगिरे, जिल्हा प्रमुख रमेश कोंडे, शिवसेना कामगार सेना अध्यक्ष सुधीर कुरुमकर, शिवसेना महिला आघाडीच्या पूजा रावेतकर, सुदर्शना त्रिगुणाईत यासह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.