मुलांचे उज्ज्वल भवितव्य घडवणारी शाळा पुणे इंटरनॅशनल स्कूल

ल्या काही वर्षांत शिक्षण पद्धतीत आमुलाग्र बदल झाले आहेत. हे बदल स्पर्धात्मक जीवनात आजकालच्या पिढीला त्वरित आत्मसात करावे लागत आहेत. पुस्तकी शिक्षणासोबत व्यावहारिक शिक्षणही तितकेच महत्त्वाचे आहे. हे लक्षात घेऊन मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी “पुणे इंटरनॅशनल स्कूल’ने कायमच मेहनत घेतली आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील आत्मविश्‍वास वृद्धिंगत करण्यासाठी या शाळेची भूमिका आमुलाग्र ठरली आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्यात निर्माण झालेले सलोख्याचे नाते याचीच साक्ष देतात.

पुणे इंटरनॅशनल स्कूल पुण्यापासून अवघ्या 18 किमी अंतरावर धानोरी येथील विद्यानगरमध्ये आहे. स्कुलची स्थापना कौशल्य विकासशिक्षण देण्याच्या उद्देशाने केली गेली आहे.विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देऊन त्यांना जीवनातील प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्टतेसाठी सक्षम करण्याचा प्रयत्न शाळेचा असतो. आज पीआयएस हे शैक्षणिक उत्कृष्टतेचे केंद्र आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील आत्मविश्‍वास वृद्धिंगत करण्यासाठी या शाळेची भूमिका आमुलाग्र ठरली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना शाळेचे संस्थापक हुलगेश चलवादी म्हणाले, एक सुरक्षित, काळजी घेणारे, वातावरण देण्यासाठी विशेष भर दिला जातो. विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांमध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्‍यक कौशल्ये विकसित केली जातात. पीआयएसमधील विद्यार्थ्यांना प्रतिकूल आणि सतत बदलणाऱ्या समाजाशी जुळवून घेण्याच्या त्यांच्या सर्वात मोठ्या क्षमतेचे समर्थन केले जाते.

शारीरिक किंवा मानसिक क्षमता, संस्कृती आणि परंपरा यांचा आदर करणे, हेच एक सामर्थ्य आहे हे समजून घेऊन, इथले शिक्षकही ज्ञानादर्जनाची सेवा करण्यास समर्पित आहेत. शाळेचे ध्येय म्हणजे सक्रिय आणि सर्जनशील मनाने, विद्यार्थ्यांचे मन जिंकून, त्यांच्यात आत्मविश्‍वास निर्माण करणे हेच असते. त्याच अनुषंगाने लहान प्रत्येक मुलाच्या एकूण आध्यात्मिक, नैतिक, बौद्धिक, सामाजिक, भावनिक आणि शारीरिक पातळीवर उद्याचा उत्तम नागरिक बनवणे, हेच ध्येय “पीआयएस’ने बाळगले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.