राजगुरूनगर -खेड तालुक्याच्या पूर्व भागातील गुळाणी परिसरातील जरेवाडी येथील हिरामण बाळु जरे यांच्या गोठ्यात बांधलेल्या दोन पाळीव कालवडीवर बिबट्याने हल्ला करीत ठार केल्याने परिसरात बिबट्याच्या वास्तव असल्याचे समोर आले आहे.
जरेवाडी गावच्या पश्चिमेला म्हणजेच नवीन पुणे नाशिक महामार्गाच्या खेड बाह्यवळण घाट रस्त्याच्या पूर्व भागातील वेहळदरा परिसरात वनविभागाच्या डोंगर परिसरात ही घटना रात्री अकराच्या सुमारास घडली.
बाळु जरे यांच्या गोठ्यातील एक गीर आणि एक जर्शी गायीचे वासरू ठार झाले. वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.