शिक्रापूर – येथील पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस हवालदार विकास दत्तात्रय कुंभार यांची नुकतीच पोलीस हवालदार पदावरुन सहायक पोलीस उपनिरीक्षकपदी बढती झाली आहे. पुणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घिट्टे यांच्या हस्ते विकास कुंभार यांना सन्मानित करण्यात आले.
पोलीस दलातील पोलिसांच्या सेवा कार्यकाळानुसार बढती झालेली असताना पुणे ग्रामीण पोलीस दलातील तब्बल छत्तीस जणांची पोलीस हवालदार पदाहून सहायक पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती झालेली होती. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले कुंभार यांची देखील बढती झाली आहे.
कुंभार यांनी यांनी यापूर्वी शिक्रापूर, शिरुर, लोणीकंद आदी पोलीस ठाण्यात कार्यरत राहून वेगवेगळ्या गुन्ह्याची उकल केली आहे. त्यांची नुकतीच सेवा कार्यकालानुसार पोलीस हवालदार या पदातून सहायक पोलीस उपनिरीक्षकपदी बढती झाली आहे. शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, सहायक पोलीस निरीक्षक वैभव पवार आदी अधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.