Bank Holiday June 2024| जर तुम्ही पुढील महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम करणार असाल तर त्यापूर्वी ही बातमी वाचा. बँकेशी संबंधित काम असल्यास तुमची सर्व कामे पुढील आठवड्यात लवकर पूर्ण करा. कारण जून महिन्यात 10 दिवस बँक बंद असणार आहेत.
जूनमध्ये दर आठवड्याच्या रविवारी आणि महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकांना सुट्टी तर आहेच त्या व्यातिरिक्त ही अनेक सुट्ट्या आहेत. जूनमध्ये बँकांना एकूण १० दिवस सुट्टी असणार आहे. त्यामुळे तुमच्या कामाचा खोळंबा होऊ नये, यासाठी पुढील महिन्यात बँका कधी बंद असणार आहेत. हे जाणून घ्या…
जूनची पहिली सुट्टी २ जून रोजी असेल, कारण रविवारी असल्याने बँका बंद राहतील. सणांबद्दल बोलायचे झाले १७ जून ला बकरी ईदमुळे जवळपास संपूर्ण देशात या दिवशी बँका बंद राहतील. तर काही ठिकाणी १८ जूनला बकरी ईदही साजरी केली जाणार आहे. जम्मू आणि श्रीनगरमध्ये बकरीदची सुट्टी दोन दिवस असते. अशा स्थितीत १८ जूनलाही येथील बँकांमध्ये कामकाज होणार नाही. Bank Holiday June 2024|
जून महिन्यात या दिवशी राहणार बँका बंद
- २ जून २०२४- रविवार असल्याने बँकांना साप्ताहिक सुट्टी
- ८ जून २०२४ – दुसरा शनिवार असल्याने देशभरातील बँका बंद
- ९ जून २०२४ – रविवार असल्याने बँकांना साप्ताहिक सुट्टी
- १५ जून २०२४- वायएमए डे किंवा राजा संक्रांतीमुळे भुवनेश्वर आणि आयझॉल झोनमध्ये बँका बंद
- १६ जून २०२४ – रविवार असल्याने बँकांना साप्ताहिक सुट्टी
- १७ जून २०२४ – बकरी ईदमुळे जवळपास संपूर्ण देशात बँका बंद
- १८ जून २०२४ – बकरी ईदमुळे जम्मू आणि श्रीनगर झोनमध्ये बँका बंद राहतील.
- २२ जून २०२४ – चौथा शनिवार असल्याने बँकांना सुट्टी
- २३ जून २०२४ – रविवार असल्याने बँकांना साप्ताहिक सुट्टी
- ३० जून २०२४ – रविवार असल्याने बँकांना साप्ताहिक सुट्टी Bank Holiday June 2024|
दरम्यान, ऑनलाइन बँकिंग आणि एटीएमसारख्या सुविधा सुट्टीच्या दिवशीही सुरू असणार आहेत. जर तुम्हाला कोणताही महत्त्वाचा व्यवहार करायचा असेल तर तुम्ही तुमचे काम या माध्यमातून पूर्ण करू शकता. बँक बंद असताना सर्व ऑनलाइन सुविधा सुरू राहणार आहेत. याद्वारे तुम्ही तुमची महत्त्वाची कामे पूर्ण करू शकता. बँकांना सुट्टी असली तरी या सुविधांवर काहीही परिणाम होणार नाही.
हेही वाचा:
‘भाजप दीडशेच्या वर जाणार नाही’; शेवटच्या टप्प्यापूर्वी कोणी केला हा मोठा दावा?