महाळुंगे इंगळे -पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या चाकण पोलीस ठाणे अंकित महाळुंगे इंगळे पोलीस चौकीचे तब्बल सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. तसे राजपत्रच महाराष्ट्र शासनाकडून 16 जानेवारी 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे.
राज्यपाल यांचे आदेशानुसार व शासनाचे सह सचिव मागील सहा वर्षांपासून महाळुंगे पोलीस चौकीचे पोलीस ठाण्यात वर्गीकरण करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरु होते. पण काही राजकीय अनास्तथेत हे पोलीस ठाणे लाल फितीत अडकले होते. पण सहा वर्षांच्या अथक प्रयत्नाने अखेर आता महाळुंगे पोलीस चौकीचे महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे झाले आहे.
महाळुंगे, खराबवाडी, आंबेठाण, बोरदरा, भांबोली, वराळे, वासुली, कोरेगाव खुर्द, शिंदे, सावरदरी, खालुंब्रे, सांगुर्डी, येलवाडी, कान्हेवाडी तर्फे चाकण, मोई, निघोजे, कुरूळी (पुणे-नाशिक हायवे व हायवेची), कोहिंडे खुर्द, गडद, वेल्हावळे, रौंधळवाडी, आखतुली, सुपे, आडगाव, पाळु, अनावळे, कासारी, टेकवडी, हेंद्रुज, तोरणे बुद्रुक, अहिरे. या गावांचा समावेश आहे.