आळंदी -चैत्र शुद्ध बल प्रतिपदा गुढीपाडवा नवीन वर्षाची सुरुवात ही माऊलींच्या संजीवन समाधीवर चंदन उटीचा लेप देऊन केली जाते. या नवीन वर्षातील आजची ही पहिली चंदन उटी आहे. यापुढे अक्षय तृतीया, रामनवमी व नरसिंह जयंती अशा एकूण चार चंदन उट्या माऊलींच्या संजीवन समाधीवर वेगवेगळ्या रूपात साकारल्या जातात.
आजची पहिली चंदन उटी ही श्रीक्षेत्र रांजणगाव येथील महागणपतीचे अवतार अशी अतिशय देखणे, सुरेख, नेत्रात कायमचे साठवून ठेवावे असे रूप माऊलींच्या संजीवन समाधीवर पुणे येथील कलाकार अभिजीत धोंडफळे, उमा धोंडफळे, मोरेश्वर जोशी व त्यांचे सर्व सहकारी यांनी अतिशय सुरेख हुबेहूब असे रूप साकारले होते.
ते पाहण्यासाठी व माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांसह आळंदीकरांनी देखील माऊली मंदिरात रात्री उशिरापर्यंत एकच गर्दी केली होती.