कापूरहोळ-वातावरणात प्रचंड उष्मा वाढला असल्याने सगळ्यांची नजर थंड पेये, लिंबू सरबत, उसाची गुऱ्हाळे शोधताना दिसत आहेत. याबरोबरच रस्त्याच्या कडेला असलेल्या कलिंगडांच्या ढिगाऱ्यांकडेही नागरिकांचे पाय वळत आहेत.
कापूरहोळ, नसरापूर महामार्ग परिसरात कलिंगडांचे ढिगारे रस्त्यांवर दिसू लागले असून, त्याच्या खरेदीसाठी ग्राहकांच्या गर्दी होत आहे. कलिंगडाचे दर 50 रुपयांपासून ते 200 रुपयांपर्यंत आहेत.
कलिंगड आता परिपक्व झाली असून; पण बाजारपेठेवर मंदीचे सावट आहे. विक्रीवर त्याचा परिणाम झाला आहे. सध्या रस्त्यावर शेतकरी किरकोळ विक्री करीत आहेत; परंतु बाजारपेठेअभावी शेतकरी अडचणीत आहे, असे कासुर्डीचे शेतकरी संतोष धावले यांनी सांगितले.