निमसाखर – वन्यजीव संघटनेकडून इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी येथे चिंकारा पाहण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रवीशंकर यांना निमंत्रित करण्यात आले आहे. इंदापूर तालुक्यातील गडबनवाडी हे क्षेत्र ऑक्सिजन पार्क व चिंकारा व अन्य प्राण्यांसाठी या परिसराची ओळख आहे. या ठिकाणी गेली अनेक वर्षांपासून फ्रेंड्स ऑफ नेचर क्लब या संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणापासून ते वन्यजीव संरक्षणासाठी या संघटनेने काम केले आहे.
याचा परिणाम परिसरात झाडांची संख्या वाढली असून चिंकारासाठी पाण्याची सोय झाल्याने या परिसरात चिंकाराचे मुक्त दर्शन होत असते. या ठिकाणी पंतप्रधान कार्यालयाचे माजी सचिव तथा राष्ट्रीय क्षमता निर्माण आयोगाचे प्रशासकीय सदस्य प्रवीणसिंह परदेशी याचबरोबर अकलूज येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. एम. के. इनामदार यांसह अन्य मान्यवरांचे या परिसरावर विशेष प्रेम आहे.
नुकतेच शिंगणापूर या ठिकाणी श्री श्री रविशंकर गुरुजी यांना भेटण्याचा योग आला. भेटीदरम्यान त्यांना इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी वनविभागातील प्रसिद्ध असणारे व दुर्मिळ जातीचे वन्यजीव प्राणी म्हणून ज्यांचा नाम उल्लेख केला जातो असे चिंकारा जातीचे हरिनाची एक फ्रेम देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या सामाजिक संघटनेच्या वतीने त्यांना या जंगलामध्ये पाहण्यासाठी आमंत्रित करत या वेळी चिंकाराची फ्रेम भेट देण्यात आले. यावेळी माजी मंत्री महादेव जानकर, निवृत्त अधिकारी प्रभाकर देशमुख, मुंदडा, किशोर वाघ, फ्रेंड्स ऑफ नेचर क्लब सदस्य रवी श्रीकांत करे, तात्यासाहेब वडापुरी हे उपस्थित होते.