माळेगाव – महापुरुषांविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशा मागणीचे निवेदन भिमसैनिकांनी माळेगांव पोलीस ठाण्यात दिले. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक देविदास साळवे यांनी निवेदनाचा स्वीकार केला. निवेदनावर माजी सदस्य रुपेश भोसले, संतोष भोसले, विशाल घोडके, विश्वास भोसले, प्रवीण बनसोडे, प्रशांत वाघमोडे, मिलिंद भोसले, प्रणव तावरे, संदीप आढाव, निहाल भोसले,मिटु भोसले, रोहित लोंढे, अविनाश वाघमारे, रोहित गायकव ाड, मंगेश नवले, दादा सोनवणे, प्रशांत साबळे, सुयोग सातपुते, जालिंदर अडागळे यांच्या सह्या आहेत.
बारामतीत घोषणाबाजी
बारामती/ जळोची -बहुजन समाजाची अस्मिता असणाऱ्या महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी केलेल्या भाजपचे नेते राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा सर्व पक्ष आणि विविध सामाजिक संघटनाच्या वतीने शहरातील भिगवण चौक येथे निषेध व्यक्त करण्यात आला.यावेळी उपस्थितांनी भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला.
यावेळी माजी नगराध्यक्ष कैलास चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष भारत अहिवळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष जय पाटील, बसपाचे प्रभारी काळुराम चौधरी, भारत मुक्ती मोर्चाचे ऍड. सुशील अहिवळे, कॉंग्रेसचे रोहित बनकर,शिवसेनेचे उमेश दुबे, मनसेचे विनोद जावळे, आरती शेंडगे, वंचितचे मंगलदास निकाळजे, माजी नगरसेवक गणेश सोनवणे, बिरजू मांढरे, अभिजित चव्हाण, सूरज शिंदे, विजय खरात, दिनेश जगताप, ऍड. धीरज लालबिगे, मुनीर तांबोळी, गजानन गायकवाड, ऍड. अरविंद गायकवाड आदी लोखंडे उपस्थित होते.
वाल्ह्यात”हाय हाय’च्या घोषणा
वाल्हे -पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध वाल्हे (ता. पुरंदर) येथील महात्मा फुले विकास प्रतिष्ठान, समता परिषद, ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांच्या वतीने निषेध करण्यात आला. यावेळी, सरपंच अमोल खवले, माजी सरपंच दत्तात्रेय पवार यांच्या हस्ते महात्मा फुले स्मारकास पुष्पहार अर्पण करून, केंद्रातील, राज्यातील भाजप सरकार, तसेच चंद्रकांत पाटील, राज्यपाल हाय, हाय, यांचा निषेध करीत, त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी, महात्मा फुले विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष सूर्यकांत भुजबळ, उपाध्यक्ष दादासाहेब राऊत, तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष सत्यवान सूर्यवंशी, प्रा. संतोष नवले, सागर भुजबळ, दादासाहेब म्हेत्रे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
राजीनामा घ्या – ऍड. तापकीर
आळंदी -पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांच्या कार्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करून जनतेच्या भावना दुखावल्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष ऍड. विष्णू तापकीर यांनी केली आहे.
आज खेड-शिवापूर टोल बंद आंदोलन
खेड शिवापूर -भीमसैनिक, महाविकास आघाडीच्या वतीने बेताल वक्तव्यांचा निषेध करण्यासाठी रविवार (दि. 11) खेड शिवापूर येथील टोल नाका बंद आंदोलन सकाळी 10 वाजता करण्यात येणार आहे. पालकमंत्री, राज्यपाल यांच्यासह अन्य मंत्र्यांनी केलेल्या बेताल व्यक्तव्याच्या निषेधार्थ रविवारी (दि. 11) सकाळी 10 वाजता हवेली, भोर, वेल्हा येथून येणाऱ्या तमाम भीमसैनिकांच्या वतीने खेड शिवापूर टोल नाका अडवून येथून जाणाऱ्या वाहनांना टोल न घेता मोफत सोडण्यात यणार आहे.
या आंदोलनास महाविकास आघाडीचाही पाठिंबा आहे. या आंदोलनाच्या दिवशी कोणत्याही प्रकारची टोल वसुली चालू ठेवू नये, असे आवाहन युवक अध्यक्ष आरपीआय आठवले गट पुणे जिल्हा प्रवीण ओव्हाळ, अध्यक्ष कामगार आघाडी महाराष्ट्र राज्य आरपीआय प्रदीप कांबळे, तसेच महाविकास आघाडी यांनी दिली आहे.
“मंत्रिमंडळातून बडतर्फ करा’
चिंबळी -उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना बडतर्फ करण्यात याव, अशी मागणी निवेदनाद्वारे राष्ट्रपती व राज्यपाल यांच्याकडे महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाने केली असल्याची माहिती महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी सांगितले. चंद्रकांत पाटील यांनी भीक मागितले असा शब्दप्रयोग करून महापुरुषांचा अवमान केलेला आहे.
शिक्षणासाठी भीक नव्हे तर विविध स्वरूपात देणग्या मिळाल्या आहेत. बहुजन समाजातील या महापुरुषांनी सर्व देशवासीयांसाठी काम केले असून आजही त्यांचे कार्य दीपस्तंभसारखे प्रेरणादायी व स्वाभिमान निर्माण करणारे आहे. देशाचे प्रेरणास्थान असलेल्या महापुरुषांचा अपशब्द वापरून अवमान केल्याबद्दल त्यांना बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. यावेळी राज्य सल्लागार दिगंबर काळे उपस्थित होते .