शिक्रापूर – पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती पैलवान मंगलदास बांदल यांच्यावर फसवणूकप्रकरणी गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांना शिक्रापूर पोलिसांनी 26 मे 2021 रोजी अटक केली होती. त्यांनतर त्यांच्यावरील गुन्ह्यांची संख्या वाढत गेल्याने त्यांची कोठडी अनेक दिवस वाढलेली असताना अखेर एक वर्ष आठ महिन्यांनी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
यामुळे बांदल गटात उत्साह संचारला आहे. बांदल समर्थकांमध्ये आनंदाचे वारे वाहू लागले असून शिक्रापूर येथे मंगलदास बांदल यांच्या समर्थकांनी फटाके वाजवत जल्लोष केला आहे.
पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती पैलवान मंगलदास बांदल यांच्यासह त्यांच्या काही साथीदारांवर शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फसवणूकप्रकरणी गुन्हे दाखल होताच शिक्रापूर पोलिसांनी गोपनीयता बाळगत बांदल यांना अटक केली होती.
त्यांनतर त्यांच्यावर फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल झाल्याने त्यांच्या कोठडीत वारंवार वाढ होत गेली. त्यांनतर काही गुन्ह्यांमध्ये जामीन मंजूर होत काही गुन्ह्यांमध्ये जामीन मंजूर होणे बाकी असल्याने त्यांना दिलासा मिळत नव्हता. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढत होत्या. अखेर आज न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला असल्याने अखेर एक वर्ष आठ महिन्यांनी मंजूर केला आहे.