पुणे – सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी केंद्र पुरस्कृत मिशन शक्ती या एकछत्री योजनेच्या संबल या उपयोजनेंतर्गत “१८१ महिला हेल्पलाईन” या घटक योजनेसाठी निधी वितरीत करण्यास महिला व बाल विकास विभागाने मान्यता दिलेली आहे.
राज्याला संकटग्रस्त महिलांना तातडीने आवश्यक माहिती व सहाय्य मिळण्यासाठी १८१ महिला हेल्पलाईन या घटक योजनेच्या ७५ लाख ६० ह्जार इतक्या निधीची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. केंद्र शासनाने सन २०१५-१६ मध्ये १८१ महिला हेल्पलाईन या योजनेसाठी उपलब्ध करुन दिलेला ६२ लाख ७० हजार इतका अखर्चित निधी केंद्र पुरस्कृत मिशन शक्ती या एकछत्री योजनेच्या संबल या उपयोजनेंतर्गत खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
त्यास अनुसरुन केंद्र शासन पुरस्कृत वन स्टॉप सेंटर या घटक योजनेच्या लेखाशिर्ष या उद्दिष्ट्याखाली महिला हेल्पलाईन व्यवस्थापन खर्च व दूरध्वनी देयक अदा करण्यासाठी निधी महिला व बाल विकास आयुक्त यांना वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.