पुणे – वेश्‍याव्यवसायातून पाच मुलींची सुटका

पुणे – कोरेगाव पार्क परिसरातून मल्याळी आणि हिंदी अभिनेत्रींची वेश्‍याव्यवसायातून सुटका केल्यावर परराज्यातील आणखी पाच मुलींचीही सुटका करण्यात आली. कोरेगाव पार्कमधील स्पा सेंटर आणि एका हॉटेलवर छापा टाकून ही कारवाई केली. कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात संबंधित दलालांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बहाद्दरपूरे यांना एजंट सूरज व मोहित हे वेगवेगळ्या हॉटेलमध्ये मुली ठेवून त्यांची छायाचित्रे ग्राहकांना पाठवून वेश्‍याव्यवसाय करत असल्याची माहिती मिळाली होती. यातील काही रक्‍कम मुलींना देऊन उरलेली रक्‍कम ते स्वत: ठेवत होते. याप्रमाणे कोरेगाव पार्क येथील “ओ’ हॉटेलमध्ये छापा टाकला असता, पश्‍चिम बंगाल व गुजरात येथील दोन मुली मिळून आल्या. या दोन्ही मुलींची सुटका करून त्यांना हडपसर येथील रेस्क्‍यू फाउंडेशन येथे ठेवण्यात आले.

सलून ऍन्ड स्पा सेंटरवर छापा
कोरेगाव पार्कमधील नॉर्थ मेन रस्त्यावरील ओऍसिस सलून ऍन्ड स्पामध्ये मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्‍याव्यवसाय केला जात असल्याची माहिती मिळाली होती. येथे ठेवलेल्या थेरपिस्टना जास्तीच्या पैशांचे आमिष दाखवून वेश्‍याव्यवसाय केला जात होता. ग्राहकांकडून मसाजच्या नावाखाली चार ते पाच हजार रुपये घेतले जात होते. पोलिसांनी येथे छापा टाकल्यावर विविध राज्यांतील तीन मुली आढळल्या. याप्रकरणी स्पाचे मालक विशाल शंभू पंडित (21, रा. कोरेगाव पार्क), नोकर आदित्य सुलेमान (21) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलींना हडपसर येथील रेस्क्‍यू फाउंडेशन येथे ठेवण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.