पुणे : वडगावशेरी मतदार संघातील ईव्हीएम पडले बंद; मतदारांना मनस्ताप

पुणे – वडगावशेरी येथील ईव्हीएम मशीन बंद पडल्याची माहिती समोर येत आहे. धानोरी येथील बाबूराव टिंगरे शाळेतील ईव्हीएम मशीनमध्ये बंद पडल्याने मतदान केंद्रांवर गोंधळ उडाला आहे. यामुळे मतदारांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

दरम्यान, भाजप-शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार जगदीश मुळीक, बहुजन समाज पक्षाकडून राजेश बेंगाळे, एमआयएम पक्षाकडून डॅनियल लांडगे, शिवसेनेकडून चंद्रकांत सावंत, “बळीराजा’ पक्षाकडून विठ्ठल गुल्हाने, तर शशिकांत राऊत आणि सविता औटी यांनी अपक्ष अर्ज भरला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.