आज लोकसाशाहीचा उत्सव – नितीन गडकरी
मुंबई : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यातील अनेक भागांत कोसळणाऱ्या पावसामुळे निवडणूक यंत्रणांना रविवारी दिवसभर तारेवरची कसरत करावी लागली. राज्यातील 3,237 उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे. दरम्यान, आज सकाळपासूनच राज्यातील राजकारण्यांनी सकाळपासूनच मतदानाचा हक्क बजावण्यास सुरूवात केली आहे.
#MaharashtraAssemblyPolls: Senior Nationalist Congress Party(NCP) leader Praful Patel & his wife Varsha cast their votes at a polling booth in Gondia assembly constituency. Gopal Agarwal from BJP & Amar Varade from Congress are contesting from this constituency. pic.twitter.com/9K0KJ715Y9
— ANI (@ANI) October 21, 2019
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि त्यांची पत्नी वर्षा पटेल यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. गोंदियाच्या मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केले. भाजपाचे उमेदवार गोपाळ अग्रवाल आणि कॉंग्रेसचे उमेदवार अमर वर्दे यांच्यात याठिकाणी मुख्य लढत होत आहे.
Union Minister Nitin Gadkari and wife Kanchan, after casting their vote in Nagpur. #MaharashtraAssemblyPolls pic.twitter.com/b8qLWHLYOi
— ANI (@ANI) October 21, 2019
दरम्यान, आज लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आहे. सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा. सर्वांनी आपलं कर्तव्य पार पाडावा. गेल्या पाच वर्षांत जे काम झालंय त्या विकासाकडे पाहून जनता भाजपासोबत राहिल असा विश्वास. त्यांनी नागपूरमध्ये आपला मतदानाचा हक्क पार पाडला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
भाजपातर्फे विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांना बेलापूरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांनी सहकुटुंब आपला मतदानाचा हक्क बजावला. त्याच्यासमोर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक अशोक गावडे आणि मनसेचे गजानन काळे याचं आव्हान असणार आहे. गेल्या वर्षांत पहिल्यांदाच बेलापूरमधून माजी आमदार गणेश नाईक हे निवडणुकीच्या रिंगणात नाहीत. यावेळी ते ऐरोली मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. राधाकृष्ण विखे-पाटलांनी यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी शालिनीताई विखे-पाटील.
खासदार सुजय विखे-पाटील आणि धनश्री विखे-पाटील यांनीदेखील मतदानाचा हक्क बजावला. तिकडे सोलापूरातही सुशीलकुमार शिंदे यांनी बजावला मतदानाचा हक्क बजावला. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत आपला मतदानाचा हक्क बजावला.यावेळी त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदेही उपस्थित होत्या. सोलापुरातील जागृती विद्या मंदिर नेहरु नगर येथे त्यांनी मतदानाचा हक्क बजावला.