पुणे : पीएमपीएमएलने गेल्या 3 वर्षात पुण्यातील सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेत कमालीचा कायापालट केलाय. हा कायापालट यापूर्वी कधीही झालेला अस आपण नक्की म्हणू शकतो इतका तो नागरीकांना जाणवतोय. पर्यायी इंधनाच्या संदर्भात देशात सार्वजनिक वाहतुकीत झालेले हे आतापर्यंतचे सर्वोत्तम परिवर्तन आहे. PMPML -ने डिझेल आणि CNG वरून इलेक्ट्रिक मोबिलिटीकडे जाताना ही परिवहनसेवा भारतातील सर्व परिवहन उपक्रमांसाठी एक उदाहरण आणि आदर्श बनवलेली आहे.
पीएमपीएमएल मध्ये मागच्या 3 वर्षांत 150 इलेक्ट्रिक बसेस दाखल झाल्या आणि आणखी 500 बसेस येउ घातल्या आहेत. यातील 206 बस पुण्याच्या रस्तावर धावत आहेत. म्हणजेच या बस धरून एकूण ३५० इलेक्ट्रिक बसचा ताफा पीएमपीएमएल कडे आहे. उर्वरित ३०० बसेस लवकरच म्हणजे जून जुलै च्या अखेरीस पुण्यात दाखल होतील. या सर्व बस पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि विस्तारित मेट्रो क्षेत्रासाठी वापरल्या जात आहेत. अर्थात लांब शहरातील लांब पल्याच्या मार्गावर त्या धावत आहेत.
पीएमपीएमएलने यशस्वीरीत्या चालवत असलेल्या या प्रकल्पाची पाहणी आणि कौतूक अनेक जणांनी केलय. यात एसटीयूचे विविध एमडी, परिवहन सचिव, परिवहन अधिकारी यांचा समावेश आहे. भारतभरातून यासह अनेकांनी पुण्याला भेट दिली आणि सार्वजनिक वाहतुकीच्या यशोगाथेचा अभ्यास केला. पंतप्रधानांनी मार्च 2022 मध्ये त्यांच्या पुणे भेटीदरम्यान 100 हून अधिक इलेक्ट्रिक बसेस समर्पित केल्या. याचाच पुढचा भाग म्हणून आता, मुख्य लांब मार्गांवर इलेक्ट्रिक बसचा ताफा तैनात करण्याव्यतिरिक्त, PMC आणि PCMC लास्ट माईल कनेक्टिव्हिटी/शटल बसेसची सुरवात करण्याचा विचार करत आहे.
लास्ट माईल कनेक्टिव्हिटी म्हणजे काय?
लास्ट/फायनल माईल कनेक्टिव्हिटी हा एक सोप्पा उपाय आहे जो लोकांना पुणे विमानतळ, पुणे मेट्रो आणि बीआरटी मेन कॉरिडॉर किंवा शहरातील इतर कोणत्याही लांबच्या मार्गावर प्रवासासाठी पोहोचण्यास मदत करतो. लास्ट माईल कनेक्टिव्हिटीमुळे पुणेकरांना त्यांच्या कार्यालयातून आणि घरातून लवकरात लवकर त्यांच्या अपेक्षीत ठीकाणी पोहोचण्यास मदत होईल. 12m आणि 9m बसेस लांब मार्गाच्या प्रवासासाठी वापरल्या जाऊ शकतात आणि घर किंवा कार्यालयाच्या थेट कनेक्टिव्हिटीसाठी मात्र छोट्या बसेस गरज आहे. म्हणजे 7 ते 8 मीटर लांबीच्या छोट्या बसेस.
पीएमपीएमएलने यापूर्वीच सुमारे ५० सीएनजी शटल बसेस तैनात केल्या आहेत ज्या यशस्वीपणे कार्यरत आहेत. या बस सेवांना “ATAL” (ऑल लेन अलाइनिंग ट्रान्झिट) असे नाव दिले गेले आहे. यात 5 किमी प्रवास असेल, बस प्रत्येक 5 मिनिटाला सुटेल आणि त्याचे 5 रुपये तिकीट भाडे असेल. पुणे आणि पिंपरी चिंचवड भागातील 9 नवीन मार्गांवर ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
परवडणाऱ्या किमतीत सर्वोत्तम सार्वजनिक वाहतूक उपलब्ध करून देणारी PMPML ही कदाचीत देशभरातील एकमेव वाहतूक संस्था असेल. “ATAL” लाँच झाल्यानंतर अनेक प्रवासी PMC आणि PCMC ची वेगवान आणि माफक सार्वजनिक वाहतूक सेवा वळले आहेत.
पीएमपीएमएल या फीडर बस सेवा प्रकल्पाची सांगड पुणे मेट्रोशी घालत आहे. त्यामूळे मेट्रो वापरकर्ते या बसचा वापर करून त्यांच्या जवळपासच्या इप्सित स्थळी पोहोचू शकतील.
आणखी ३०० लास्ट माईल कनेक्टिव्हिटी ई बसेसची निविदा पीएमपीएमएलने या आधीच प्रसिद्ध केली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड विभागातील सुमारे ६० मार्गांचा यात समावेश आहे.या बसेस सकाळी 5 पासून धावतील आणि दिवसाला सरासरी 200 किमी अंतर कापतील. या 300 बसेसमूळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळेल. येत्या काळात PMC, PCMC आणि PMPML प्राधिकरणाचे प्रयत्नामूळे पुणेकरांना माफक किमतीत जागतिक दर्जाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध होईल.
* शाळकरी मुले
* महाविद्यालयीन विद्यार्थी
* खाजगी. कर्मचारी
* शासन नोकर
* महिला आणि ज्येष्ठ नागरिक
* विशेष सक्षम
* महापालिका कामगार
* अर्ध वेळ व्यावसायिक
* दैनंदिन कामगार
* घरकाम करणारे
* आरोग्य सेवा कर्मचारी
*आयटी कर्मचारी
* विमानतळ प्रवासी
लास्ट माईल कनेक्टिव्हिटीचे अतिरिक्त फायदे:
1. PMPML च्या महसुलात वाढ
2. सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणारे अधिक प्रवासी अर्थात पर्यावरण पूरक वाहतूक व्यवस्था
3. वातानुकूलित बसेस
4. रस्त्यावरील रहदारी कमी
5. रस्त्यांवरील अपघात कमी
7. तेल इंधनाचा वापर कमी
8. बाईक आणि कार वापर कमी झाल्याने प्रदूषण पातळी कमी