१५ लाख ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत
ओझर : स्थानिक गुन्हे शाखा व नारायणगाव पोलीस स्टेशन यांनी संयुक्त कारवाई करत पिस्तुलाचा धाक दाखवून चोरी करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. दरम्यान, यावेळी त्यांच्याकडून चोरी केलेला १५ लाखांपेक्षा जास्त किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
या गुन्ह्यात वापरलेली ५ लाख रु किमतीचे स्विफ्ट कार आणि चोरून नेलेले ७० हजार रु किमतीचे टायर तसेच १० लाख रू किमतीचा टाटा कंपनीचा अल्ट्रा ट्रक असा एकूण १५ लाख ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल गुन्ह्याचे कामी जप्त करण्यात आला असल्याची माहिती नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली.
आतिफ अहमद बेग व शफिक रफिक सय्यद, दोन्ही रा. जुन्नर, ता. जुन्नर, जि. पुणे असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या इसमांची नावे असून
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी बलवीर गजराज सिंग(५०) सध्या रा निघोज व्हिलेज चाकण ता.खेड जि. पुणे. मूळ रा. लेवडा ता.कामा, जि. डीग भरतपुर ,राजस्थान यांच्या ताब्यातील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची महिंद्रा ब्लाझो ४९ या नवीन चेसी गाडीस स्विफ्ट कार आडवी लावून पिस्तुलाचा धाक दाखवून फिर्यादीस खाली उतरून स्विफ्ट कारमध्ये बसवून फिर्यादीचे डोळ्याला काळी पट्टी व हातपाय बांधून फिर्यादीचे ताब्यातील नवीन चेसी गाडीचे मागील बाजूचे टायर जबरदस्तीने काढून नेले होते.
सदरचे गुन्ह्याबद्दल गोपनीय बातमीदार यांचेकडून महिती घेऊन सदरचा गुन्हा हा आतिफ अहमद बेग व शफिक रफिक सय्यद यांनी केला असल्याची माहिती मिळालेने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्या सूचनेनुसार सदरील दोन्ही इसमांस ओळखून त्यास ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली आहे.शफिक रफिक सय्यद यावर यापूर्वी नारायणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे.
सदरची कारवाई ही पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक अंकित गोयल अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर, यांचे मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर स.पो.नि महादेव शेलार (नारायणगाव पो स्टे.) पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत, अमित सिदपाटील,पो.हवा. दीपक साबळे,पो.हवा. विक्रम तापकीर,पो. हवा. राजू मोमीन,पो.हवा. अतुल डेरे,पोलीस नाईक संदीप वारे,पो.कॉ अक्षय नवले,पो.कॉ.निलेशसुपेकर चा.सहा.फौजदार मुकुंद कदमनारायणगाव पोलीस स्टेशनचे, पोलीस उपनिरीक्षक सनील धनवे,पो.हवा. रमेश काठे,पो.कॉ. गोरक्ष हासे,पो.कॉ. महेश काठमोरे पो.कॉ. सत्यम केळकर,पो. कॉ.गोविंद केंद्रे,पो.कॉ.सचिन सातपुते,होमगार्ड जेजुरकर,नवले यांनी केली आहे घटनेचा पुढील तपास नारायणगाव पोलीस करत आहे.