शहरात चर्चेला उधाण : अजित पवार यांच्या सूचनेनंतर बॅनर झळकला
जळोची – राज्याचे राजकारण अजित पवार यांच्या बंडानंतर ढवळून निघाले आहे. मात्र, बारामतीत अजित पवार यांना कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडून प्रोत्साहन देताना पहायला मिळत आहे.अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर बारामतीत अनेकांनी बॅनर लावले आहेत.
“आमचा विठ्ठल, आमचा दादा’ या आशयाचे बॅनर लावल्याने त्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, त्या बॅनरवरून चक्क शरद पवार यांचा फोटो नसल्याने अजित पवार यांची नेमकी भूमिका काय याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडून बंड करीत राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी बाहेर पडून मंत्री पदाची ही शपथही घेतली. त्यामुळे शरद पवार यांनी ऍक्टिव्ह होत त्यांना शह देण्यासाठी तयारी सुरू केली आहे. मात्र, या बॅनरबाजीमुळे अजित पवारांची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार यांनी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी दाखल होत आपल्या पुढच्या रणानिंतीचे रणशिंग फुंकले आहे.
मात्र, अजित पवार उपमुख्यमंत्री पदाच्या बॅनरवरून शरद पवार यांचा फोटो गायब झाला. असून फक्त अजित पवार यांचाच फोटो बॅनरवर दिसत आहे. अजित पवार यांच्या विठ्ठलाचाच फोटो बॅनरवरून गायब झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माझ्या निवडीचे बॅनर लावला तर शरद पवार साहेबांचा देखील फोटो लावावा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. मात्र, या बॅनरवर विठ्ठलाचा फोटो नसल्याने शहरात तर्क- वितर्कांना उधाण आले आहे.