नगररोडवरील महाराष्ट्र केसरी स्पर्धा भव्यदिव्य होणार
लोणीकंद – भारतीय कुस्ती महासंघाच्या वतीने व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने पुणे जिल्ह्यातील फुलगाव (ता. हवेली) येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेच्या मैदानावर 66वी वरीष्ठ राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दि. 4 ते 8 नोव्हेंबरदरम्यान येथे होत आहे. स्पर्धेच्या आयोजनाची पाहणी करण्यासाठी आलेले कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष व खासदार रामदास तडस यांनी यावषीर्ची स्पर्धा भव्य दिव्य होईल, असे आश्वासन दिले.
यावेळी माजी आमदार दीपक पायगुडे, प्रदीप कंद, कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पै. संदीप भोंडवे, सरचिटणीस पै. योगेश दोडके, पै. मेघराज कटके, पै आबासाहेब काळे, पै. सचिन पलांडे, पै. युवराज पोकळे, पै. सचिन कोरडे, पै, तानाजी जाधव व पै. जिवन लगड आदी उपस्थित होते.
5 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता कुस्ती स्पधेर्चे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार व मंत्री चंद्रकांतदादा पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, राज्य कुस्तीगीर संघाचे 8 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता सर्व वजन गटातील अंतिम कुस्त्या व महाराष्ट्र केसरी किताबाची कुस्ती होणार असून स्पर्धेचा बक्षिस समारंभ केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या शुभहस्ते होईल.
या स्पर्धेत महाराष्ट्र केसरी होणाऱ्या कुस्तीगीरास थार ही चारचाकी गाडी तसेच उपमहाराष्ट्र केसरीला ट्रॅक्टर बक्षिस म्हणून देण्यात येणार आहे. उर्वरीत वजनगटात प्रथम क्रमांक मिळविलेल्या कुस्तीगीरास स्प्लेंडर दुचाकी, द्वितीय क्रमांकास रोख वीस हजार व तृतीय क्रमांकास रोख दहा हजार रुपये बक्षिस म्हणून देण्यात येतील. या वरीष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत शासनाच्या वतीने प्रथम क्रमांकास 60 हजार, द्वितीय कमांकास 55 हजार व तृतीय क्रमांकास 50 हजार रूपयांचे मानधन दरवर्षी देण्यात येत असते.
फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेमध्ये साधारण 50 हजार प्रेक्षक क्षमता असलेले स्टेडीयम उभारण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभाग घेणारे कुस्तीगीर, कुस्ती मार्गदर्शक, संघ व्यवस्थापक व पंच यांच्या राहण्याची व भोजनाची व्यवस्था शाळेच्या कॅम्पसमध्ये करण्यात आली आहे.
1200 मल्ल भिडणार
या स्पर्धेत 36 जिल्हा व 6 महानगरपालिका असे एकूण 42 संघ सहभागी होत आहेत. एका कुस्ती संघात गादी विभागातील 10 व माती विभागातील 10 असे एकूण 20 कुस्तीगीर 2 कुस्ती मार्गदर्शक व 1 संघ व्यवस्थापक असे एकूण 23 जणांचा सहभाग असेल. साधारण या कुस्ती स्पर्धेत 900 कुस्तीगीर 100 कुस्ती मार्गदर्शक व 142 व्यवस्थापक, 80 पंच व 50 पदाधिकारी असे एकुण 1200 जणांचा सहभाग असेल.