मंचर : सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ अंतर्गत सन 2022-23, गेटेड साठवण बंधारा बांधकामासाठी 0 ते 100 हेक्टर सिंचन क्षमतेच्या शिरूर-आंबेगाव तालुक्यात एकूण 14 गेटेड साठवण बंधारा योजनेसाठी 10 कोटी 12 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला. अशी माहिती आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विष्णू काका हिंगे यांनी दिली.
आंबेगाव तालुक्यातील ठाकरवाडी- गोसावीमळा (32 लाख), ठाकरवाडी- काळमाथा (30 लाख 83 हजार), साल पाणीपुरवठा विहिरीजवळ (23 लाख 44 हजार), साल- बाभूळवाडी पूल (25 लाख 34 हजार), वाळूंजनगर- पट्टीचामळा (32 लाख 73 हजार),
लोणी- शहा शेताजवळ (31 लाख 13 हजार), काळेवाडी- स्मशानभूमीजवळ (25 लाख 33 हजार), महाळुंगे पडवळ- काळदरा क्रमांक 4 (29 लाख 26 हजार), धामणी-पहाडदरा – कुरकुटदरा (तीन कोटी 90 लाख).
शिरूर तालुक्यातील करंदी- कदम वस्ती (21 लाख 53 हजार), हिवरे साळुंखेवस्ती क्रमांक 1 (25 लाख 64 हजार), सविंदणे, बनाचा-ओढा (41 लाख 34 हजार), खैरेवाडी, पांढरी-ओढा (22 लाख 55 हजार), केंदूर-थिटेवाडी (दोन कोटी 81 लाख 35 हजार).