“पूजन’ संपर्क कार्यालयावरही खबरदारी
मंचर – सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मंचर (ता. आंबेगाव) येथील “मल्हार’ निवासस्थानी आणि संपर्क कार्यालय “पूजन’ येथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून मंचर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे.
लोकप्रतिनिधी आणि काही राजकीय नेत्यांनी मराठा आंदोलनाबाबत चुकीचे वक्तव्य केल्याने त्यांची निवासस्थानी आणि कार्यालयांची फोडतोड करण्यात आली आहे, त्यामुळे खबरदारीची उपायोजना म्हणून राज्य सरकारने ज्या ज्या ठिकाणी लोकप्रतिनिधी आहे किंवा राजकीय महत्त्वाचे नेते आहे.
त्यांच्या निवासस्थानी आणि संपर्क कार्यालयांमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. त्यानुसार मंचर पोलीस ठाण्याच्या वतीने सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मंचर येथील “मल्हार’ निवासस्थानी आणि पिंपळगाव रोड येथील “पूजन’ संपर्क कार्यालयात पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.
याबरोबरच वळसे पाटील यांच्या निरगुडसर निवासस्थानी पारगाव पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.