दीपावलीपासून खरेदीसाठी गर्दी : माळेगाव परिसरातील चोखंदळ ग्राहकांची विश्वासार्हता
माळेगाव – यंदा दुष्काळाचे सावट असले तरीही सर्वसामान्य नागरिकांनी दिवाळी सणाच्या कालावधीत सोने -चांदी खरेदी केली आहे. दर्जेदार, आणि गुणवत्ता असल्याने ग्राहकांची विश्वासार्हता अधोरेखित झाली आहे, अशी माहिती एस. पी. सराफ प्रा. लिमिटेडचे संचालक शिवाजी क्षीरसागर यांनी दिली. यंदा चांगली आर्थिक उलाढाल झाल्याने बाजारपेठेला झळाळी आली आहे.
सर्वसामान्यांपासून ते मोठ्यांपर्यंत दिवाळीतील सण हा आनंदाचा खरेदीचा समजला जातो. या सणाला सोने खरेदीची अनेक काळापासून सुरू असलेली परंपरा जोपासली जाते. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक आपल्या कुवतीप्रमाणे दागिना खरेदी करताना दिसतात.
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यातील सोने खरेदीसाठी सुप्रसिद्ध असलेल्या एस. पी. सराफ प्रा. ली. या सराफी पेढीत अनेक ग्राहकांनी सोने -चांदीचे दागिने खरेदी केले.
सर्व ग्राहकांना सोन्याच्या खरेदीवर चांदीचे नाणे भेट देण्यात आले आहे. सण, उत्सवात ग्राहकांची पहिली पसंती ही एस.पी. सराफ पेढीला आहे. एस. पी. सराफ पेढीचे संचालक शिवाजी क्षीरसागर यांनी ग्राहकांची विश्वासार्हता संपादन केली आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याच्या दरात वाढ झाली असली तरी अनेकांनी सोन्यात गुंतवणूक करण्याऐवजी सोन्याचे डोलरे, रिंगा, गंठण अशा गरजेच्या वस्तू घेतल्या आहेत. चांदीमध्ये पैंजण – जोडवी, तर लक्ष्मीपूजनाला लक्ष्मी कॉइनची मोठी खरेदी करण्यात आली.
– शिवाजी क्षीरसागर, संचालक, एस. पी. सराफ प्रा. लि. माळेगाव.