रेडा -श्री छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना व महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेनुसार कर्जमाफी होऊन पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक व विविध कार्यकारी संस्थांनी पात्र शेतकऱ्यांकडून जादा व्याजाची आकारणी केली होती. व्याजाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याच्या मागणीसाठी इंदापूर तालुका युवा सेनेच्या वतीने उपोषण करण्यात आले.
दरम्यान, जिल्हा बॅंकेने आंदोलनाची दखल घेत वसूल केलेली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश दिले. इंदापूर तहसील कार्यालयासमोर युवा सेनेच्या वतीने जिल्हा सरचिटणीस सूरज सानप यांच्या नेतृत्वाखाली (दि.21) एकदिवसीय उपोषण करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार भास्कर ओहळ यांच्याकडे निवेदन देण्यात आले.
यावेळी शरदचंद्र सूर्यवंशी, सूरज सानप, कुलदीप निबांळकर, सचिन इंगळे, लक्ष्मण अजबे, नवनाथ सुतार, अनिल सूर्यवंशी, निखिल देवकर, बाळासाहेब नलवडे, विनायक लोंढे, प्रतिक रायते, रोहण सोनवणे, सदानंद वाघमोडे, योगेश हरिहर, सनी हरिहर, सोमनाथ भगत, अक्षय गुळीक उपस्थित होते. प्रा. डॉ. जयश्री गटकुळ, संभाजी चव्हाण, सागर मिसाळ यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला.
इंदापूर येथे उपोषण सुरू असल्याचे पुणे जिल्हा बॅंकेच्या प्रशासनाला समजल्यानंतर बॅंकेचे इंदापूरचे झोनल अधिकारी यांनी तत्काळ कार्यवाही करीत खासगी संस्थांनी साठ ते सत्तर टक्के शेतकऱ्यांना त्यांची रक्कम पूर्वीच जमाखाती केली आहे. उर्वरित शेतकऱ्यांना बचत खात्यात जमा करण्यासाठी संस्थांनी तत्काळ कारवाई करून शेतकऱ्यांच्या व्याजाचा जमाखर्च लवकर करावा, शेतकऱ्यांच्या बचत खाती जमा करावा, असे पत्राद्वारे आदेश दिले आहेत.