जुन्नर -हाथरसमध्ये झालेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणाने देश होरपळून निघाला आहे. देशभरात संतापाची लाट उसळली असताना जुन्नरमध्ये देखील या घटनेचा निषेध केला जात आहे.
हाथरस येथील बलात्कार प्रकरण आणि उत्तर प्रदेश सरकारच्या दडपशाही विरोधात जुन्नरमध्ये स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (डऋख), डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (ऊधऋख) आणि डाव्या पुरोगामी संघटनांच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
पोलीस आणि उत्तर प्रदेश सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत पीडितेला न्याय देण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी डीव्हायएफआयचे तालुकाध्यक्ष गणपत घोडे, तालुका सचिव संजय साबळे, एसएफआयचे राज्य समिती सचिव मंडळ सदस्य विलास साबळे, नवनाथ मोरे, किसान सभेचे तालुका सचिव लक्ष्मण जोशी, सुरेश साबळे, दीपक लाडके, सचिन साबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.