वाघोली – वाघोली (ता. हवेली) येथील फुलमळा– भावडी (सरस्वती पार्क) रस्त्याचे उद्घाटन पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या हस्ते करण्यात आले.
वाघोली येथील संतोष भाडळे व निखिल भाडळे यांच्या स्वतःच्या मालकीच्या जागेवर व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे व वाघोलीचे माजी उपसरपंच महेंद्र भाडळे यांनी स्वखर्चातून २० लाख खर्च करून रस्त्याचे काम पूर्ण केले. रस्त्यामुळे परिसरातील १० हजार लोकांना याचा फायदा होणार आहे.
हा रस्ता तयार झाल्यामुळे सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांनी समाधान व कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी आव्हाळवाडीचे माजी उपसरपंच संदेश आव्हाळे, माजी ग्रामपंचायत सदस्य दत्ता कटके, उद्योजक संतोष देशमुख, ग्रामपंचायत माजी सदस्य सुधीर भाडळे, जयसिंग भाडळे, चैतन्य सातव, लखन भाडळे, भारत सातव, स्वप्नील भाडळे, शेखर बडे, विशाल शिंदे, नागरिक उपस्थित होते.
वाघोली येथील सुमारे १० हजार नागरिकांचा रस्त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मालकीची जागा देणारे संतोष भाडळे, निखिल भाडळे व त्या जागेवर स्वखर्चातून रस्ता बनवून देणारे रामभाऊ दाभाडे, महेंद्र भाडळे यांनी सामाजिक बांधिलकीचा एक नवा आदर्श उभा केला आहे. नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहणार आहे.
– प्रदीप कंद, माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद पुणे.