भोर – भोर शहरातील पार्थ रावळ यांची भोर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार गट) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पार्थ रावळ यांना भोर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) अध्यक्ष पदासाठी निवड झालेले पत्र देण्यात आले.
या प्रसंगी भोर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरदचंद्र पवार गट)अध्यक्ष रवींद्र बांदल, कार्याध्यक्ष संदीप नांगरे,युवक अध्यक्ष गणेश खुटवड, माजी अध्यक्ष प्रशांत जाधव, माजी नगराध्यक्ष विठ्ठल शिंदे,युवा नेते अनिल पवार, भोर शहराध्यक्ष माजी नगरसेवक यशवंत डाळ, कार्यकर्ते उपस्थित होते.
युवकांचे संघटन करुन सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून केलेल्या विकास कामे तळागाळापर्यंत पोहोचवणार असल्याचे नूतन अध्यक्ष पार्थ रावळ यांनी सांगितले.