मुळशी तालुका क्रीडा संकुलातील खेळाडूंचा सत्कार
पिरंगुट – दिल्ली येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत मुळशीतील खेळाडूंनी मिळवलेले यश ही अभिमानास्पद बाब आहे. येथे सराव करणार्या खेळाडूंसाठी सर्वोपतरी मदत केली जाईल, असे आश्वासन खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले.
भरे (ता. मुळशी) येथे मुळशी तालुका क्रीडा संकुलातील खेळाडूंनी राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत यश संपादन केल्याबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
त्यावेळी त्या बोलत होत्या. प्रतिक्षा सुतार, श्वेता ववले, सुयश भिंगारदिवे, शिवराज साखरे, तन्वी जाधव, सिद्धी ढमाले, अथर्व मातेरे, शिवम महाले, कुणाल मालपोटे, प्रणाली ढमाले, प्रीती शिर्के, ऋषिकेश ठाकरे, सनी सटाले, साहिल मालपोटे, सार्थक पडळघरे या खेळाडूंना सुळे यांच्या गौरविण्यात आले.
सर्व खेळाडू मुळशी तालुका क्रीडा संकुल मध्ये एनआयएस कुस्ती कोच, पै. प्रा. सागर तांगडे व पै. प्रतिक्षा सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव करतात. यावेळी महादेव कोंढरे, बाळासाहेब चांदेरे, दगडूकाका करंजावणे, स्वाती ढमाले, प्रताप शिळीमकर, सागर साखरे, सुखदेव तापकीर, जगदीश ववले, शिवाजी तांगडे, स्वस्तिक चोंधे, जितेंद्र इंगवले, राहुल पवळे,
संतोष पवळे, भरत मारणे, संदीप पवार, हनुमंत मणेरे आदी मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक सागर तांगडे यांनी केले. संदीप पवार यांनी आभार मानले.