बारामतीत पदाधिकाऱ्यांची भेट
बारामती – माझ्या सुरवातीच्या राजकीय कारकीर्दीपासून बारामती शहर आणि तालुक्यातील मुस्लीम समाज बांधव हे नेहमी सामाजिक ऐक्याचे विचारांसोबत राहिला आहे. त्यामुळेच बारामतीच्या पंचक्रोशीतील मुस्लीम बांधव कधीही कोणत्याही चुकीच्या विचारांसोबत जाणार नाहीत, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.
हजरत मोहम्मद पैगंबर जयंती (ईद ए मिलाद उन नबी) चे औचित्य साधून बारामती शहरातील मरहूमा फरजाना फाऊंडेशन यांनी इस्लाम सर्वासाठी हा उपक्रम राबविला. उपक्रमाअंतर्गत पवार यांना मरहूमा फरजाना फाऊंडेशनतर्फे दिव्य मराठी कुरआन व इस्लामिक मराठी साहित्य भेट देण्यात आले.
यावेळी बारामती मुस्लीम आम जमातचे अध्यक्ष जब्बार पठाण, मरहूमा फरजाना फौउंडेशनचे अध्यक्ष जहीर पठाण, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष ऍड. सुभाष ढोले, ऍड. अमित ढोले, मुनीर तांबोळी, समीर मुलाणी, एजाज अत्तार, जावेद बागवान, अमान पठाण उपस्थित होते.
पुरोगामी विचार मांडावा लागेल
आजच्या राष्ट्रीय, सामाजिक तसेच महाराष्ट्रातील शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांबद्दल चर्चा करीत असताना सध्याची राजकीय परिस्थिती, पुरोगामी विचार प्रामाणिक राहून हा विचार लोकांपुढे मांडावा लागेल, अशी चर्चा करण्यात आली.