पुणे जिल्हा परिषदचे शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी, मुळशी तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी एक अग्रगण्य, कार्यकुशल, तडफदार, जिल्ह्यातील न्यायी व सत्याच्या मार्गावर चालणारे किसन दत्तोबा भुजबळ यांचे निधन झाले आहे. ते 55 वर्षांचे होते. हृदयविकाराच्या झटका आल्याने किसन दत्तोबा भुजबळ यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार घेत असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
आज त्यांच्या मूळ गावी कासारी तालुका शिक्रापूर येथे त्यांच्यावर दुपारी ३ वाजता अंत्यविधी होणार आहे. भुजबळ यांचे मुळशी वरती असलेल्या प्रेमापोटी काम करत असताना कधीही कुणापुढे झुकले नाही. त्यांची प्रशासनावर प्रचंड पकड होती. त्यांच्याकडे कोणत्याही समस्येवर उत्तर हमखास असायचे. दिलाचे दिलदार, मैत्रीचा शिरोमणी असे सुप्रसिद्ध कार्याचा वारसा जपणारे आपले शिक्षणं क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व आज या जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या जाण्याने मुळशी तालुक्यातील शिक्षण विभागातील सहकारी तसेच मुळशीकर हळहळ व्यक्त करत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी,भाऊ,बहिणी आहेत.